वाळूमाफियांनी घातली तहसीलदारांच्या अंगावर गाडी
भीमा नदी पात्रात वाळू चोरी होत असल्याची माहिती तहसीलदार वाघमारे यांना मिळाली होती त्या माहितीच्या आधारे तहसीलदार हे तलाठी व इतर शासकीय कर्मचाऱ्यांना घेऊन त्या ठिकाणी कारवाईसाठी गेले असता बिगर नंबरची गाडी त्यांच्या अंगावर घालून त्यांना गंभीर दुखापत करण्याचा प्रयत्न वाळू माफियांकडून करण्यात आला आहे.
याबाबत पंढरपूर शहर पोलीस स्टेशन मध्ये वाळू चोरी करणे सरकारी कामात अडथळा आणणे आदी कलमान्वये अण्णा पवार, ज्ञानबा धोत्रे, भैया गंगथडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Post Comment
No comments