शेतजमीन घ्यायला sbi ची नवीन योजना, बँक देणार पैसे



तुमची शेत जमीन घायला एसबीआय बँक करणार मदत तुम्हाला; एसबीआय लँड परचेस स्कीम काय आहे योजना?




जमीन खरेदी करण्यासाठी एसबीआय ८५ टक्के रक्कम देणार, शिल्लक असलेले १५ टक्के रक्कम तुम्हाला द्यावी लागेल.

शेतकऱ्यांना पूर्ण जमिनीचे पैसे फेडण्यासाठी ७ ते १० वर्षाची मुदत, बँकेचे पूर्ण पैसे फेडल्यानंतर जमीन तुमच्या मालकीची होणार, कर्ज जेव्हापर्यंत फेडल्या जात नाही त्या काळापर्यंत जमीन बँकेच्या नावावर राहिल.

📝 अर्ज करण्यासाठी पात्रता
२.५ एकर पेक्षा कमी सिंचित जमीन, यासह ज्यांच्या कडे शेती नाही असे भूमीहीन शेतकरीही या योजनेसाठी अर्ज करु शकतील.

कर्ज घेणाऱ्या व्यक्तीकडे साधरण दोन वर्षाचे कर्ज परत फेडचा रेकॉर्ड पाहिजे अथवा  दुसऱ्या बँकेकडून घेतले फेडलेले असल्यास त्यांनाही प्राधान्य देण्यात येईल आणि अर्जदारावर कोणत्या दुसऱ्या बँकेचे कर्ज नसावे.

1 comment: