मुलींसाठी लवकरच कुस्ती संकुल सुरू होणार : आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू कौशल्या वाघ


मुलींसाठी रायगाव, जि. सांगली येथे लवकरच कुस्ती संकुल सुरू होणार असल्याची माहिती आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू कौशल्या वाघ यांनी दिली आहे. 

सांगली जिल्ह्यातील रायगाव येथे 24 तास सिक्युरिटी, सीसीटीव्ही कॅमेरे, आंतरराष्ट्रीय तालीम, माती व मॅट वरील कुस्ती साठी वेगवेगळे आखाडे, होस्टेल, मेस यांसंह विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकलेल्या महिला प्रशिक्षण अशी उच्च सुविधा असलेली फक्त मुलींसाठी ची तालीम उभारणीचे काम प्रगतीपथावर असून लवकरच मुलींची ही तालीम सुरू होणार आहे. 


ग्रामीण भागातील मुलींना योग्य ते मार्गदर्शन मिळत नाही व त्यामुळे मुली आंतरराष्ट्रीय स्पर्धेत जाऊ शकत नाहीत. खेड्यातील मुलींकडे स्पिरिट आहे त्यांना तंत्रशुद्ध डावपेच शिकवले तर त्या नक्कीच यश मिळवतील असा विश्वास ही यावेळी वाघ यांनी व्यक्त केला.

No comments