अहिल्यादेवी होळकर यांच्या भव्य दिव्य पुतळ्याबाबत बैठक



पुण्यश्लोक वंदनीय अहिल्यादेवी होळकर यांचा भव्य-दिव्य पुतळा 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ' येथे साकारण्यासंदर्भात महत्त्वाची बैठक आज विद्यापीठात कुलगुरु आणि सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत संपन्न झाली.



पुतळ्याचे डिझाईन लवकरात लवकर प्राप्त करणे आणि पुतळ्याच्या लोकवर्गणीसाठी आवश्यक असणारे नवे बँक खाते उघडण्यासंदर्भात यात सविस्तर चर्चा झाली.

महत्त्वाची बाब म्हणजे, पुतळा उभारणी समितीत समाजातील आजी-माजी आमदार, खासदार, मंत्री यांच्यासह समाजातील राज्याच्या विविध भागातील प्रमुख व्यक्ती आणि विद्यापीठ नामांतरण समितीच्या माध्यमातून लढा देणाऱ्या प्रमुख व्यक्तींचा समावेश करावा, अशी विनंतीही बैठकीत केली.
देशातील सर्व विद्यापीठातील पुतळ्यांपैकी सर्वात भव्य पुतळा उभारण्याचा आपला मानस असून यासंदर्भात वेगाने सर्व प्रक्रिया पूर्ण करण्याकडे कल आहे असे पडळकर यांनी सांगितले.

कुलगुरु डॉ. मृणालिनी फडणवीस आणि त्यांच्या सर्व टीमने पुतळा उभारणीचे काम तातडीने हाती घेतल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदनही आमदार पडळकर यांनी केले.


बैठकीला कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस, प्र.कुलगुरू डॉ. देवेंद्र मिश्रा, अधिष्ठाता डॉ. विकास कदम, कुलसचिव डॉ. विकास घुटे यांच्यासह श्री. माऊली हळणवर, प्रा.सुभाष मस्के सर, श्री. अमोल कारंडे, श्री. शरणू हांडे, श्री. समाधान खांडेकर आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.


No comments