प.पु.भाईनाथ महाराज कारखानीस समाधी मंदिरात गुरुपौर्णिमा निमित्त कार्यक्रम

वेळापूर लाइव्ह टीम । वेळापूर
वेळापूर, ता. माळशिरस येथील महानयोगी प.पु.भाईनाथ महाराज कारखानीस यांच्या समाधी मंदिरात गुरुपौर्णिमा निमित्त दि.१९ जुलै रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.वेळापूर येथील पुणे पंढरपूर रस्त्यावरील श्रीधर कुटी समाधी मंदिर येथे पहाटे ५ ते ७ या वेळेत भाईनाथ महाराज यांच्या समाधीस रुद्राभिषेक होणार आहे. त्यानंतर अखंड भजन व प्रवचन होईल. तर दुपारी महाआरती झालेनंतर समाधी मंदिर परिसरात महाप्रसादाचे वाटप केले जाणार आहे. सकाळी आरती नंतर संध्याकाळच्या आरतीपर्यंत भाविकांसाठी दर्शन सुरु राहणार आहे.
सकाळी होणारा रुद्राभिषेक भाविकांना 'वेळापूर लाइव्ह' या फेसबुक पेजवरती सकाळी ९ नंतर पाहावयाला भेटेल.
***********************************************
वेळापूर लाइव्ह टीम
वाचत राहा : www.velapurlive.blogspot.com
फेसबुक पेज लाइक करा : www.facebook.com/velapurlive

No comments