शीतल माने वेळापूर मधून प्रथम, पूजा देशमुख द्वितीय, श्वेता भाकरे तृतीय । वेळापूर मध्ये लोकविकास शिक्षण संस्था अव्वल
वेळापूर, ता. माळशिरस येथून माने शितल प्रभाकर हिने इयत्ता १२ वि। परीक्षेत ७४.९२% गुण मिळवून वेळापूर मधून प्रथम क्रमांक मिळवला तर देशमुख पूजा उदधव (७२.७६%) हिने द्वितीय व भाकरे श्वेता शहाजी (७१.०६) हिने तृतीय क्रमांक पटकावला. स .म .शंकरराव मोहिते-पाटील वि.व ज्युनिअर कॉलेज वेळापूर चे विद्यार्थी वेळापूर मध्ये अव्वल राहिले तर शिक्षण संस्थेत ९२.३०% निकाल लावून लोकविकास शिक्षण संस्था अव्वल राहिली.
वेळापूर येथील लोकविकास शिक्षण संस्थेचा इयत्ता १२ वि चा निकाल ९२.३० टक्के लागला. लोकविकास शिक्षण संस्थेतून विज्ञान शाखेतून एकूण २६ विद्यार्थ्यांनी इयत्ता १२ विची परीक्षा दिली होती त्यापैकी ग्रेड १ मधून ७ विद्यार्थी, ग्रेड २ मधून १६ तर ग्रेड ३ मधून १ असे एकूण २४ विद्यार्थी पास होऊन लोकविकास शिक्षण संस्थेचा ९२.३० टक्के निकाल लागला आहे. तर इंग्लिश स्कुल वेळापूर येथून विज्ञान शाखेतून एकूण ६२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती . त्यापैकी ग्रेड १ मधून २, ग्रेड २ मधून ३२ तर ग्रेड ३ मधून १८ असे एकूण ५२ विद्यार्थी पास होऊन प्रशालेचा एकूण निकाल ८३.८७ टक्के लागला.
सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील विद्यालय वेळापूर येथून कला शाखेतून एकूण १०० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी ग्रेड १ मधून १७, ग्रेड २ मधून ४८ तर ग्रेड ३ मधून ०९ असे एकूण ७४ विद्यार्थी पास होऊन प्रशालेचा एकूण निकाल ७४ टक्के लागला.
लोकविकास मधून १} ननवरे प्रितेश प्रभाकर (६८%) २) गायकवाड दुर्गेश ज्ञानेश्वर (६५.५३%) ३) घोगरे राजसिंह बाळासाहेब (६५.३८%) इंग्लिश स्कुल वेळापूर मधून १)मांडवे दिव्या अशोक (६५.२५%) २) कोळे स्वप्नील रामकृष्ण ( ६०%) ३) भाकरे प्रीती महादेव (५६.३०%) तर सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील विद्यालय वेळापूर येथून १) माने शितल प्रभाकर (७४.९२%) २) देशमुख पूजा उदधव (७२.७६%) ३) भाकरे श्वेता शहाजी (७१.०६) असे अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक आले आहेत.
क्रॉप सायन्स या विषयात लोकविकास शिक्षण संस्थेचा गायकवाड दुर्गेश ज्ञानेश्वर (१८८/२००) हा विद्यार्थी वेळापूर केंद्रात प्रथम आला आहे.



Congratulations all girls
ReplyDelete