वेळापूरच्या मोहिते-पाटील विद्यालयात 10 वी च्या 122 विद्यार्थ्यांना निरोप
येथील सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील विद्यालयातील विद्यार्थ्यांचा नुकताच निरोप समारंभ उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक सुरेश साळुंखे हे होते.प्रारंभी माळशिरस तालुक्याचे भाग्यविधाते सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील व विद्येची आराध्य देवता सरस्वती देवीच्या प्रतिमांचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
विद्यार्थ्यांनी आठवण म्हणून शाळेला सप्रेम भेटवस्तू दिली.यावेळी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सर्व शिक्षकांचा सत्कार केला.यावेळी स्टेजवरती पर्यवेक्षक युवराज जरे,शिक्षक प्रतिनिधी दत्तात्रय माने-देशमुख, दहावी वर्गाचे वर्गशिक्षक राजाराम चव्हाण, शहाजी दुधकर, प्रभावती कुलकर्णी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त करताना शाळेतील आठवणींना उजाळा दिला.यावेळी श्रावणी फुटाणे,शिवराज घाटगे याने मनोगत व्यक्त केले.विद्यालयातील तृप्ती मार्डीकर, शहाजी दुधकर, राजाराम चव्हाण,मुख्याध्यापक सुरेश साळुंखे यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्वेता माने-देशमुख व पूजा माने-देशमुख हिने केले तर आभार श्रावणी माळवदकर हिने मानले.
No comments