अर्धनारी नटेश्वर महाविद्यालय, वेळापूर येथे स्वातंत्र्यवीर सावरकरांना अभिवादन
शिक्षण प्रसारक मंडळ अकलूज, संचलित अर्धनारी नटेश्वर महाविद्यालय, वेळापूर येथे इतिहास विभागाच्या वतीने स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुन्यतिथीनिमित्त अभिवादनपर कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्रा. अभिजीत घाडगे यांनी सावरकरांच्या संघर्षमय आयुष्यातील वेचक प्रसंग सांगून सावरकरांच्या काव्यप्रतीभेचा परिचय करून दिला. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. माने आर.पी यांनी सावरकरांचे विज्ञाननिष्ट विचार आजच्या पिढीने अनुसरले पाहिजेत असे प्रतिपादन केले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. अपर्णा गुरव यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रा. नानासाहेब वरकड यांनी मांडले. या कार्यक्रमाला सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संखेने उपस्थीत होते.
No comments