स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांची पुण्यतिथी साजरी


           येथील सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील विद्यालयात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. विद्यालयाचे पर्यवेक्षक युवराज जरे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला.यावेळी स्टेजवरती मुख्याध्यापक सुरेश साळुंखे, दत्तात्रय माने-देशमुख,कुंडलिक कोळेकर, शहाजी दुधकर, राजाराम चव्हाण उपस्थित होते.
        प्रारंभी सर्व मान्यवर व विद्यार्थी प्रतिनिधी यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सिद्धी राऊत हिने केले.यावेळी अमृता देशपांडे व शहाजी दुधकर यांनी आपल्या भाषणातून स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या कार्याला उजाळा दिला.युवराज जरे यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना सावरकर यांचे देशासाठीचे कार्य सांगितले.
       या कार्यक्रमाचे नियोजन विद्यालयातील इयत्ता सातवी 'अ' मधील  विद्यार्थ्यांनी केले होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तुषार कदम व महेश खराडे यांनी केले तर समृद्धी येवले हिने आभार मानले.

No comments