72 हजार पदांची मेगाभरती, ऑफलाईन पद्धतीने भरती !!!
राज्यात 72 हजार पदांच्या मेगाभरतीला सुरूवात झालीये. मात्र ही मेगाभरती महापोर्टलद्वारे नाही तर ऑफलाईन होणार आहे. सामान्य प्रशासन विभागातील वरिष्ठ सूत्रांनी ही माहिती दिली आहे. मेगाभरती सुरू करण्यासाठी आरक्षण तपासणीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
मेगाभरतीमध्ये पाणीपुरवठा, शिक्षण, महसूल, आरोग्य, गृह, सामाजिक न्याय यांसह अन्य विभागांचा देखील समावेश आहे. आता प्रत्येक विभाग स्तरावर पदभरतीची प्रक्रिया राबवली जाईल. त्यानुसार संबंधित विभागांची कार्यवाही देखील सुरू झाली आहे.
पदभरतीची प्रक्रिया एप्रिलपासून सुरू होणार असून नव्या पदभरतीनंतर राज्यावर साडे आठ हजार कोटी रूपयांचा बोजा पडणार आहे.
No comments