वेळापूरातील सर्व रस्ते काँक्रेटिकरण करणार : जानकर




वेळापूर, ता. माळशिरस गावातील जवळपास सर्वच रस्ते काँक्रेट चे झाले असून उर्वरित एक दोन रस्तेही लवकरच काँक्रेट चे होतील असे आश्वासन राष्ट्रवादी चे नेते उत्तमराव जानकर यांनी दिले.

वेळापूर येथील व्यापारी पेठेतील मुख्य रस्त्याचा काँक्रेट नसलेला अर्धा रास्ता आज काँक्रेट चा करण्यात आला. सकाळी लवकर काम झालेवर आज संध्याकाळी वेळापूर ग्रामपंचायत चे मार्गदर्शक उत्तमराव जानकर यांनी या रोडची पाहणी केली, यावेळी जानकर बोलत होते.


पुढे बोलताना जानकर म्हणाले, वेळापूर मधील एक दोन रस्ते सोडले तर सर्वच रस्ते सरपंच विमल ताई जानकर व उपसरपंच जावेद मुलाणी यांचे प्रयत्नातून आपण काँक्रेट चे केले आहेत. त्याचबरोबर उंडर ग्राऊंड गटार, पाणीपुरवठा, वीज कनेक्शन याबाबत सर्वांसाठी वेळापूर ग्रामपंचायत ने दर्जेदार काम केले असून येत्या वर्षा अखेर वेळापूर मधील एकही रस्ता आपण साधा ठेवणार नाही.

सर्व रस्ते सिमेंट काँक्रेट चे झाले असून यामुळे नागरिकांना दळण वळणासाठी फायदा होत आहे.
यावेळी वेळापूर ग्रामपंचायत चे गटनेते पांडुरंग आण्णा मंडले, उपसरपंच जावेद मुलाणी, ठेकेदार माजिद मुलाणी, शाहिद मुलाणी, सूर्या ग्रुप चे रोहित भाऊ इंगोले, नवतरुण मंडळाचे अध्यक्ष अमोल मंडलिक, युवा कार्यकर्ते धनंजय शिवपूजे, चिकू साखरे, विपुल पोरे, शंभू गाढवे, समर्थ बैठकीचे घोरपडे आदी उपस्थित होते.

No comments