वेळापूरात गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त कार्यक्रम
सालाबाद प्रमाणे याहीवर्षी वेळापूर येथील शिशु मंदिर जवळील जवळेकर यांच्या निवासस्थानी असलेल्या मंदिरामध्ये गजानन महाराज यांचा प्रकट दिन साजरा करण्यात आला.
आज सकाळी अभिषेक , ११ वाजता भजन , दुपारी १२ वाजता गुलाल आणि पुष्पवृष्टी करण्यात आली. त्यानंतर महाप्रसाद वाटप करण्यात आला. वेळापूर व परिसरातील भक्तगण यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
(छाया : धनंजय शिवपूजे)
No comments