अकलूज येथे बालरोग तपासणी, उपचार शिबीर

सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांच्या 41 व्या पुण्यतिथीनिमित्त आज दिनांक15/02/2020 रोजी उपजिल्हा रुग्णालय अकलूज येथे बालरोग तपासणी व उपचार शिबीर, कुपोषित बालके तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते.
या शिबिराचे उद्घाटन अकलूजचे सुप्रसिद्ध बालरोग तज्ञ डॉ.राजीव राणे-कविटकर सर, डॉ. नितीन एकतपुरे सर (अध्यक्ष इंडियन मेडिकल असोसिएशन अकलूज ),डॉ. स्मिता धोत्रे, डॉ.पारस व्होरा,डॉ.प्रवीण शिंदे, डॉ.मिलिंद जामदार, डॉ.मनीषा कदम,डॉ.सुप्रिया खडतरे,डॉ.मोनिका मिसाळ, डॉ. कोमल एकतपुरे, राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमाचे डॉ. प्रताप काळे, डॉ. किशोर पिसाळ, यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
तसेच यावेळी सर्व बालकांची तपासणी करून त्यांच्यावर उपचार करण्यात आले.

No comments