इस्लामपूर ते येळीव ओढा खोलीकरण व सरळीकरण कामासाठी नाम फाउंडेशनच्या दोन मशीन

नाम फाउंडेशन यांच्या वतीने इस्लामपूर ते येळीव ओढा खोलीकरण व सरळीकरण कामासाठी दोन मशीन ( पोकलेन ) देण्यात आल्या. या मशीनचे ( पोकलेन ) पूजन  पंचायत समिती उपसभापती अर्जुनसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते करुन कामाची सुरवात करण्यात आली. तसेच नाम फाउंडेशनच्या अधिकाऱ्यांनी दोन मशीन ( पोकलेन ) मोफत दिल्याबद्दल त्या अधिकाऱ्यांचा सन्मान पंचायत समिती माळशिरस यांच्या वतीने करुन   त्याचे आभार मान्यात आले.  या वेळी  पंचायत समिती माजी सभापती सौ वैष्णवीदेवी अर्जुनसिंह मोहिते पाटील, पंचायत समितीचे माजी  उपसभापती किशोर सूळ,पंचायत समिती सदस्यां हेमलता चांडोले,  नाम फाउंडेशनचे खलाटे साहेब, गणेश सगपाल, बोबडे साहेब, लघु पाठ बंधारे विभागाचे लांडगे रावसाहेब, जाधववाडी सरपंच शिवाजी जाधव,अर्जुन पवार,  शिवाजी बर्वे, रामशिव पवार, अशोक देशमुख, सुमित पवार, भाऊसो जाधव, प्रकाश पवार, लक्ष्मन गणपत पवार सुधीर पवार, कपिल देशमुख, जगनाथ जाधव, इस्लामपूर गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.

No comments