ओबीसी समाजाच्या स्वतंत्र जनगणनेचा ठराव केंद्राने फेटाळला

ओबीसी समाजाची स्वतंत्रणपणे जनगणना करण्यात यावी असा ठराव विधानसभेनं एकमताने मंजूर करून केंद्र सरकारकडे पाठवला होता. मात्र, जनगणना विभागाने ओबीसींची स्वतंत्रपणे जनगणना करण्याचा ठराव फेटाळला. तसेच अनुसूचित जाती जमाती शिवाय अन्य जनगणना करणे बंधनकराक नाही, असं विभागाने सांगितलं आहे.

28 मार्च 2019 च्या राजपत्रानुसार वेगळी ओबीसी जनगणना करता येणार नाही, असे कळविण्यात आल्याचे विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी सभागृहात बोलताना सांगितलं आहे. त्यामुळे ओबीसी समाजाची स्वतंत्रपणे जनगणना होणार नसल्याची शक्यता आहे.

No comments