लोकविकास शिक्षण संस्थेत शिवजयंती उत्साहात साजरी
लोकविकास मराठी मीडियम स्कूल वेळापूर येथे शिवजयंती पार पडली. या वेळेस शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन प्रशालेचे मुख्याध्यापक किशोर पिसे,प्रशालेचे क्रीडा विभाग प्रमुख अजित बनकर,यांनी केले. शिवरायांच्या जीवनावर आधारित रिया मानेदेशमूख हिने भाषण केले.
या कार्यक्रमास लोकविकास इंग्लीश मिडीयम च्या मुख्याध्यापिका सीमा उरणे तसेच जूनियर कॉलेज चे विभाग प्रमुख अमोल पांढरे,सचिन जाधव,अमोल साठे,नितीन माने,विजया चापले,कल्पना पांढरे,ओंकार माळवदकर यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सृष्टी गायकवाड, हिने तर आभार प्रदर्शन ओम बनकर याने केले.
No comments