उत्तमराव जानकर यांच्या हस्ते पिच पूजन संपन्न

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उत्तमराव जानकर यांच्या हस्ते वेळापूर येथील पालखी मैदानावर क्रिकेटपटूंसाठी बनवण्यात आलेल्या सिमेंट पीच चे उद्घाटन संपन्न झाले. 
वेळापूर तालुका माळशिरस येथील क्रिकेटप्रेमी दादा तुपे याने आपल्या स्वखर्चातून चाळीस हजार रुपये खर्च करून क्रिकेटप्रेमींसाठी हे सिमेंट पीच तयार केले असून पालखी मैदानावर भरविण्यात येणाऱ्या क्रिकेट स्पर्धेला या पिच उपयोग होणार आहे.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब धाईंचे, उपसरपंच जावेद मुलांनी, रजनिश बनसोडे, अमोल पणासे, हनुमंत वायदंडे, जवान माने देशमुख, संजय पनासे यांच्यासह सह अनेक क्रिकेटप्रेमी उपस्थित होते. 

No comments