लष्करातील महिला अधिकाऱयांना आता मिळणार कायमची पोस्टिंग
- लष्करातील महिला अधिकाऱयांना आता कायमची पोस्टिंग देण्याच्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केले आहे.
- लष्करातील महिलांना कायमची पोस्टिंग दिल्यास त्याचा शत्रू राष्ट्र लाभ घेऊ शकतो. त्यामुळे महिलांना कायमची पोस्टिंग (स्थायी कमिशन) देता येणार नाही, असे मोदी सरकारचे म्हणणे होते. 2010 मध्ये दिल्ली उच्च न्यायालयाने महिला अधिकाऱयांच्या बाजूने निर्णय दिला होता. त्याला मोदी सरकारने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते.
- त्यावर सर्वोच्च न्यायालयाने महिलांना कायमची पोस्टिंग देण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले आहे. महिलांना कायमस्वरूपी पोस्टिंग मिळाली पाहिजे, तो त्यांचा अधिकार आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.
- तसेच महिला पुरुषांबरोबर खांद्याला खांदा मिळवून काम करत आहेत. 30 टक्के महिला लढाऊ क्षेत्रात आताही तैनात आहेत. केंद्राने आपल्या दृष्टिकोन आणि मानसिकतेत बदल करायला हवा, लष्करात खरी समानता यायला हवी, असेही केंद्र सरकारला न्यायालयाने सुनावले.
No comments