मित्राने बायको पळवली म्हणून केला चाकूने हल्ला
बायकोला पळवून आणल्याच्या कारणावरून चिडलेल्या मित्राने सोलापुरातील बेकरी व्यावसायिक प्रज्वल ईश्वर गौडा (वय 30, रा. अवंतीनगर, जुना पूना नाका) याच्यावर चाकूने वार केला. या प्रकरणी लोहित रामा गौडा (रा. एम. होसकोपल्ली, जि. हसन, कर्नाटक) याच्यावर फौजदार चावडी पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
26 जानेवारी 2020 रोजी प्रज्वल लोहितच्या पत्नीला व तिच्या मुलीला सोलापूर येथे आणून तिच्यासोबत राहू लागला. याचा राग मनात धरून लोहितने सोलापूर गाठले. त्याने प्रज्वल याला शिवीगाळ आणि दमदाटी करत त्याच्या पाठीवर चाकूने वार केले. चाकूच्या हल्ल्यामध्ये प्रज्वल जखमी झाला आहे. प्रज्वलच्या फिर्यादीनुसार लोहित याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात आरोपी लोहित यास अटक करून पोलिसांनी न्यायालयात हजर केले. त्याला जामीन मिळाल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय साळुंखे यांनी दिली.
No comments