जन्मदिन अभिष्टचिंतन : ह.भ.प. अमोल महाराज टिंगरे एक वेगळं व्यक्तिमत्त्व

आज वेळापूर नगरीचे रहिवाशी ह. भ. प. अमोल महाराज टिंगरे यांचा वाढदिवस !
 त्यांच्या या जन्मदिनी वेळापूर लाईव्ह चा त्यांच्या कामगिरीवर एक छोटासा प्रकाशझोत......

लहानपणापासूनच डॉक्टर भाईनाथ महाराज कारखानीस यांच्या सानिध्यात आपलं बालपण रमवणारे अमोल महाराज टिंगरे हे एक अतिशय उत्तम गायक आहेत. परमपूज्य भाईंच्या दर्शनाला गेल्यावर त्याठिकाणी भाईंच्या समोर आपली गायनाची कला सादर करण्याचं नशीब मिळालेला वेळापूरमधील एक कलाकार असही त्यांना संबोधता येईल.
परमपूज्य भाईंना आपले गुरु मानून त्यांनी दिलेल्या सूत्रांवर आयुष्य जगत असताना मोठेपणी अमोल महाराज टिंगरे यांनी पेंटिंग च्या क्षेत्रात फार मोठे योगदान दिलं. आजही त्यांचे पेंटिंग काम हे अतिशय नेत्रदीपक आहे. त्याचबरोबर सामाजिक क्षेत्रातही त्यांनी भरीव योगदान आहे .





"आपली कला हेच आपलं जीवन" या सूत्राला धरून आयुष्यामध्ये अनेक कला अवगत करून त्या कलेचा लोकांच्या प्रगतीसाठी, लोकांच्या कल्याणासाठी उपयोग करणारा एक तरुण म्हणूनही ही अमोल महाराज टिंगरे यांना संबोधता येईल. त्याचबरोबर वेळापूर सह माळशिरस तालुका व जिल्ह्यातील विविध भागात आपल्या रसाळ गायनाने अनेकांना मंत्रमुग्ध करणारे एक व्यक्तिमत्व म्हणून ही त्यांची वेगळी ओळख आहे.





अतिशय उत्कृष्ट प्रकारचा फेटा बांधणे ही कला, ही संस्कृती जपून फेटा बांधणे मध्ये वेगवेगळे प्रकार शिकून ते लोकांपर्यंत पोहोचवण्यात मोठं काम त्यांचं आहे. अगदी  भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी  हे अकलूज दौऱ्यावर आले असताना  नरेंद्र मोदींना फेटा बांधण्याचे भाग्य  अमोल महाराज टिंगरे यांना मिळाले होते हे संपूर्ण जिल्ह्याला माहीतच आहे.
आजच्या या युगात फेटा बांधने की कला जवळजवळ लुप्त होत चालली आहे. मात्र अमोल महाराज टिंगरे यांनी ही कला आजही  माळशिरस तालुक्यात जिवंत ठेवली आहे त्यामध्ये त्यांचे मोठे योगदान आहे.

बाल योगी गोपाल महाराज कारखेडकर यांच्या सानिध्यात येऊन श्रीमत भगवत गीता चे प्रवचन सोलापूर जिल्ह्यासह महाराष्ट्रातील अनेक खेडोपाड्यात पोहोचवण्याचं काम ते करीत आहेत.

असे सामाजिक, कला आणि अध्यात्मिक क्षेत्रात एक फार मोठं पण कधीही प्रसिद्धीची हाव नसलेलं नाव म्हणजे अमोल महाराज टिंगरे हे आहेत.

 आज त्यांचा जन्मदिवस त्यानिमित्ताने वेळापूर लाईव्ह कडून यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !

No comments