गायत्री बाबरची खेलो इंडिया क्रीडा स्पर्धेसाठी निवड


शिक्षण प्रसारक मंडळ अकलूज, संचलित अर्धनारी नटेश्वर महाविद्यालय, वेळापूर मधील गायत्री बाबर या विद्यार्थीनिची ओडीसा मधील  भुवनेश्वर येथे होणा-या खेलो इंडिया या स्पर्धेसाठी निवड झाली आहे. जुदो कुस्ती स्पर्धेसाठी तिची निवड झाली आहे. महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष अमरसिंह माने देशमुख यांच्या हस्ते गायत्री बाबर हीचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी मा.श्री जयसिंह मोहिते-पाटील , मा.श्री अभिजीत रणवरे, प्रभारी प्राचार्य दादासाहेब साठे व क्रीडा शिक्षक प्रा. मोलाणे(भोसले) यांनी गायत्री बाबर हीचे अभिनंदन केले.

No comments