राष्ट्रनिर्मितीच्या प्रक्रियेत भारतीय नौदलाची भूमिका महत्त्वपूर्ण - राष्ट्रपती राम नाथ कोविंद
लोणावळा येथील आयएनएस शिवाजी प्रशिक्षण संस्थेला राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रपती ध्वज प्रदान
देशाच्या आर्थिक सुरक्षेत आणि राष्ट्रनिर्मितीच्या प्रक्रियेत भारतीय नौदलाची भूमिका महत्त्वपूर्ण असल्याचे प्रतिपादन राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी आज केले.
लोणावळा येथील भारतीय नौदलाच्या आयएनएस शिवाजी या प्रशिक्षण संस्थेला आज राष्ट्रपती श्री कोविंद यांच्या हस्ते राष्ट्रपती ध्वज (प्रेसिडेंट कलर) प्रदान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी राष्ट्रपतींच्या सुविद्य पत्नी सविता कोविंद, राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, नौसेना अध्यक्ष ॲडमिरल करमबीर सिंह उपस्थित होते.
No comments