एन टी प्रवर्गावर झालेल्या अन्यायाबाबत आमदार सातपुते यांनी उठवला आवाज
महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या पोलीस उपनिरीक्षक गट - ब पदांच्या भरती प्रक्रियेत एन . टी . - क तसेच एन . टी . - ड प्रवर्गातील विद्यार्थ्यावरील झालेला अन्याय दूर करून सुधारित जाहिरात प्रसिद्ध करण्याबाबत माळशिरस विधानसभा मतदार संघाचे आमदार राम सातपुते यांनी आवाज उठवला असून याबाबत त्यांनी मुख्यमंत्र्यांशी पत्रव्यवहार केला आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या संकेत स्थळावर दुय्यम सेवा अराजपत्रित गट - ब साठी पूर्व परिक्षा २०२० ची जाहिरात ( क - ०५ / २० ) प्रसिद्ध करण्यात आली आहे . त्या अंतर्गत पोलीस उपनिरीक्षक ( गट - ब ) ( अराजपत्रित ) पदांच्या ६५० जागांची भरती करण्यात येणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे . परंतु शासन निर्णयाप्रमाणे भज क ( एन . टी . - क ) प्रवर्गासाठी सरळसेवा भरतीसाठी ३ . ५ % जागा राखीव असताना केवळ २ जागा आरक्षित ठेवण्यात आल्या .
प्रत्यक्षात २२ जागा आरक्षित असायला हव्या होत्या . तसेच भज - ड ( एन . टी . - ड ) या प्रवर्गासाठी २ % जागा राखीव असताना एकही जागा आरक्षित दाखवली नाही . त्यामुळे या परिक्षेची तयारी करीत असलेल्या उमेदवारांमध्ये प्रचंड संतापाची लाट निर्माण झाली आहे . त्यामुळे भज - क व भज - ड संवर्गातील उमेदवारांवर अन्याय झालेला आहे .
अश्या आशयाचे पत्र त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले असून आपण स्वतः यात लक्ष घालून सुधारीत जाहिरात प्रसिद्ध करण्याबाबत संबंधित विभागाला तसे निर्देश देण्यात यावे अशी विनंती ही केली आहे.
No comments