मुंबई बंदरावर एक प्रवाशी कोरोना संशयित


मुंबई बंदरावर काल दाखल झालेल्या  फिलिपाईन्सच्या एम व्ही बौडिका या जहाजावरील (क्रूझ) एका फिलिपाईन नागरिकाला ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळल्याने त्याला या जहाजावरच विलगीकरण करण्यात आले. त्याचा प्रयोगशाळा नमुना कस्तुरबा मध्यवर्ती प्रयोगशाळेस पाठविण्यात आला आहे. या जहाजावर कुणीही भारतीय नसून कुणाला कसलीही लक्षणे नाहीत. हे जहाज आज पोरबंदरला पोहोचले. दरम्यान, आजपर्यंत भरती करण्यात आलेल्यांपैकी 56 जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना निगेटिव्ह आले आहेत, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. 

No comments