उमेश शिरतोडे मानाच्या गदेचा मानकरी, १६ सेकंदात मारली बाजी


एक लाख रुपये, मानाची गदा, शाल श्रीफल बक्षीस 

वेळापूर । ओंकार आडत 

खळवे, ता. माळशिरस येथील स्व. वस्ताद दत्ता आप्पा वाघमारे यांचा पट्टा पैलवान उमेश शिरतोडे याने वेळापूर येथे पालखी मैदानावर आयोजित केलेल्या कुस्त्यांचे मैदान मारले. 
पुण्याच्या वस्ताद गणेश दांगट यांचा पट्टा पैलवान संदीप काळे यांच्या गदलाड डावावर शिरतोडे याने एकलांगी नागपट्टी डाव टाकत अवघ्या सोळा सेकंदात मैदान मारले. 

उमेश शिरतोडे याला कै. वसुदेव सावंत पाटील यांचे स्मरणार्थ धनाजी सावंत पाटील यांची मानाची गदा, रुपये एक लाख चे प्रथम बक्षीस, मानाचा फेटा देऊन जयसिंह मोहिते पाटील व मल्लसम्राट रावसाहेब मगर यांच्या शुभहस्ते पारितोषिक देण्यात आले. 

द्वितीय क्रमांकासाठी सचिन चव्हाण व नाथा पालवे यांच्यातील कुस्ती नाथा पालवे या मल्लाने मारली. 
यावेळी गणेश मानगुडे यांना आदर्श कुस्ती प्रसारक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. त्याचबरोबर भरत अवार्ड विजेता अजय कश्यप व राष्ट्रीय खेळाडू रामजी कश्यप यांचा सन्मान ही कुस्ती मैदानात करण्यात आला.

पुरुषांच्या कुस्त्यांसोबत ताराराणी कुस्ती केंद्र अकलूज येथील तृप्ती जगदाळे, सोनिया राजगे, प्राची सावंत, सोनाली जगदाळे आदी मुलींच्याही कुस्त्या मैदानात पार पडल्या. 
कुस्ती मैदानास माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, धैर्यशील मोहिते पाटील, शिवतेजसिंह मोहिते पाटील, श्रीराज माने पाटील, राजकुमार पाटील, आप्पासाहेब जगदाळे, अमरसिंह माने देशमुख, मिलिंद सरतापे, रामकृष्ण जाधव यांच्यासह अनेक मान्यवरांनी भेटी दिल्या. 

कुस्ती मैदान यशस्वी रित्या पार पडण्यासाठी दत्ता भैय्या मगर यांचे मार्गदर्शनाखाली विजय पवार, गणेश चव्हाण, उमेश भाकरे, विजय चव्हाण, निखिल चव्हाण, युवराज माने देशमुख, योगेश शेटे आदींनी परिश्रम घेतले तर समालोचन धनंजय मदने यांनी केले. 

No comments