इंदोरीकर महाराजांच्या तोंडाला काळं फासू : तृप्ती देसाई

ह. भ. प. निवृत्ती महाराज इंदोरीकर यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे त्यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यासाठी भूमाता ब्रिगेडच्या संस्थापक तृप्ती देसाई यांनी आज नगरमध्ये आल्यानंतर पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन इंदुरीकर महाराजांविरोधात लेखी तक्रार दिली. त्यांच्याविरोधात तात्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली. यावेळी गुन्हा दाखल न झाल्यास इंदोरीकर महाराजांच्या तोंडाला काळं फासू, असा इशारा तृप्ती देसाई यांनी दिला आहे.

No comments