गुन्हा लपविण्याप्रकरणी फडणवीसांचा निकाल राखीव

प्रतिज्ञापत्रात दोन फौजदारी खटल्यांची माहिती लपवल्याच्या आरोपावरून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सर्वोच्च न्यायालयात पुर्नविचार याचिका दाखल करण्यात आली आहे. मात्र सर्वोच्च न्यायालयाने निकाल राखून ठेवला असून 20 फेब्रुवारीला फडणवीसांना जेएमएफसी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2014 च्या विधानसभा निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रात दोन फौजदारी गुन्ह्यांची माहिती लपवल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे. नागपूरमधील वकील सतीश उके यांनी याप्रकरणी याचिका दाखल केली आहे. 2014 मधील विधानसभा निवडणुकीवेळी 1996 आणि 1998 या दोन वर्षाच्या फौजदारी गुन्ह्यांची माहिती शपथपत्रात दिली नाही असा आरोप याचिकाकर्ते सतीश उके यांनी केला आहे.

No comments