अर्धनारी नटेश्वर महाविद्यालयाचा व्हेलनटाईन डे चा वेगळा आदर्श

शिक्षण प्रसारक मंडळ अकलूज, संचलित अर्धनारी नटेश्वर महाविद्यालय वेळापूर येथील राष्ट्रीय सेवा योजना व इतिहास विभाग यांच्या वतीने माळशिरस येथील छत्रपती शिवाजी महाराज यांची कन्या सखुबाई महादजी निंबाळकर यांच्या स्मारकाच्या जीर्णोद्धारासाठी  महाश्रमदान करण्यात आले. 
14  फेब्रुवारी वेलेनटाईन डे या दिवशी लोक आपले प्रेम व्यक्त करतात. अर्धनारी नटेश्वर महाविद्यालयातील विद्यार्थांनी एक वेगळा आदर्श प्रस्थापीत करून शिवरायांविषयी, इतिहासाविषयी प्रेम व्यक्त करत आज महाश्रमदान केले. सन 1679 मध्ये अकलूजच्या किल्याचा वेढा उठवून परतत असताना झालेल्या लढाईत माळशिरसमध्ये महादजी बजाजी निंबाळकरांना विरमरण आले. त्यांच्या मृत्यू नंतर त्यांच्या पत्नी म्हणजे शिवरायांच्या जेष्ठ कन्या सखुबाई या सती गेल्या. त्यांची समाथी माळशिरस येथे बांधण्यात आली. बरिच वर्षे दूर्लक्षीत असलेली ही समाधी गोपाळराव देशमुखांसारख्या इतिहासकारांनी प्रकाशात आणली. शिवकन्येच्या भग्न समाधीचा जिर्णोध्दार करण्याचा वसा घेऊन किरण भांगे, मावळा प्रतिष्ठाण या तरूणाने जनजागृती करत मोठे काम घाती घेतले आहे.
 त्याच्या या कामात मदत करण्यासाठी अर्धनारी नटेश्वर महाविद्यालयातील विद्यार्थांनी महाश्रमदान केले. या प्रसंगी महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष व सभापती अमरसिंह माने-देशमुख यांनी ही स्वयंसेवका बरोबर महाश्रमदानात श्रमदान केले. या श्रमदानात महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य दादासाहेब साठे, राष्ट्रिय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. नांगरे, इतिहास विभाग प्रमुख प्रा. गुरव, प्रा., घाडगे, अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा. भोसले, इंग्रजी विभागातील प्रा. वरकड आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी श्रमदान केले.

No comments