अरविंद केजरीवाल झाले तिसऱ्यांदा दिल्लीचे मुख्यमंत्री
- रामलीला मैदानावर घेतली शपथमुख्यमंत्रीपदाची शपथ घेताना अरविंद केजरीवाल
- विधानसभा निवडणुकीत भाजपा आणि काँग्रेसचा दणदणीत पराभव केल्यानंतर आम आदमी पक्ष सलग तिसऱ्यांदा सत्तेवर विराजमान झाला आहे.
- ‘आप’चे नेते अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची, तर इतर सहा नेत्यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. दिल्लीतील रामलीला मैदानावर हा शपथविधी सोहळा पार पडला.
- या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी, इतर राज्यांचे मुख्यमंत्री यांच्यासह दिल्लीच्या विकासात योगदान देणाऱ्या डॉक्टर, रिक्षा चालक, सफाई कर्मचारी, कामगार, बस मार्शल अग्निशमन दलाचे जवान आदींना विशेष निमंत्रण देण्यात आलं होतं.
- दिल्ली विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळाल्यानंतर अरविंद केजरीवाल यांनी रविवारी तिसऱ्यांदा दिल्लीचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. दिल्लीचे उपराज्यपाल अनिल बैजल यांनी केजरीवाल यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली.
No comments