एकनाथ खडसेंचा सूर बदलला; फडणवीसांचं केलं कौतुक


गेल्या पाच वर्षांत राज्याच्या राजकारणातून बाजूला फेकले गेलेले व त्यासाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच अप्रत्यक्षरित्या जबाबदार धरणारे भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचा सूर अचानक बदलला आहे. 'पक्षात राहीन की नाही भरवसा नाही' असा इशारा काही दिवसांपूर्वीच देणारे खडसे यांनी फडणवीस यांच्यासह भाजपमधील सध्याच्या नेत्याचं कौतुक केलं आहे.


No comments