धक्कादायक! तिला धावत्या ट्रेनबाहेर फरफटत नेले


ट्रेनमधील प्रवाशांच्या हातातून मोबाइल पळवण्याच्या घटना वाढल्या आहेत. मुंबईतील बोरिवली रेल्वे स्थानकाजवळ अशीच एक धक्कादायक घटना घडली आहे. एका चोरट्यानं धावत्या एक्स्प्रेसमधील महिला प्रवाशाच्या हातातून मोबाइल खेचून नेण्याचा प्रयत्न केला. त्या महिलेनं मोठ्या धैर्यानं त्याला पकडून ठेवलं. मात्र, चोरट्यानं तिला फरफटत नेले. या प्रकरणी चोरट्याला अटक केली आहे. वसिम शेख असं त्याचं नाव आहे.


No comments