सोलापूर : सामूहिक बलात्कारातील सर्व आरोपींना तत्काळ अटक करा
उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची मागणी
सोलापुरात एका दलित अल्पवयीन मुलीवर झालेल्या सामूहिक लैंगिक अत्याचाराच्या घटनेची गंभीर दखल घेत विधान परिषदेच्या उपसभापती तथा शिवसेनेच्या नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी, सर्व आरोपींना अटक करण्यात यावी आणि पीडित मुलीला तत्काळ मनोधैर्य योजनेतून आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्याकडे केली आहे.सोलापुरात विजापूर नाका पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्य़ानुसार गेल्या सहा महिन्यांपासून पीडित दलित अल्पवयीन मुलीवर सर्व आरोपी सामूहिक लैंगिक अत्याचार करीत होते. राज्यात हिंगणघाट येथील पीडितेचे प्रकरण ताजे असतानाच सोलापुरात ही घटना समोर आली आहे.
No comments