akluj । वेळप्रसंगी अन्नदान व रक्तदान करा : डॉ. धवलसिंह मोहिते पाटील

    कोरोना व्हायरसनं राज्यात थैमान घातलं आहे. राज्य सरकारने संचारबंदी, सारखे  अनेक निर्णय घेतले आहेत शासनाने वेळोवेळी दिलेल्या सुचनाचे सर्वांनी पालन करावे कोणत्याही परस्थितीत अत्यंत महत्वाचे कामाशिवाय घराबाहेर येऊ नये  सध्या कोरोनाचे संसर्गामुळे आणी शाळा महाविद्यालयाला सुट्टी असलेने रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे   या पार्श्वभूमीवर  जनसेवा संघटनेचे नेते डाॅ.धवलसिंह मोहीते पाटील यांनी जनसेवा संघटनेचे सर्व कार्यकर्त्यांना व जनतेला रक्तदान करणेचे आवाहन केलं आहे. कोरोना व्हायरस हा देशावर आलेली मोठी आपत्ती आहे. आज  संपूर्ण देश त्याचा एकजुटीने मुकाबला करतोय. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. उद्धवजी ठाकरे व उप-मुख्यमंत्री मा.अजितदादा पवार  यासाठी योग्य पावलं उचलतेय,  राज्य सरकारच्या सर्व सूचनांचे नागरिकांनी तंतोतंत पालन करावे, तसेच जनसेवा संघटनेचे सर्व कार्यकर्त्यांनी या राष्ट्रीय आपत्ती मध्ये मदतीसाठी  सहभागी व्हावे तसेच जशी गरज पडेल त्याप्रमाणे रक्तदान करावे अन्नदान करावे असे आवाहन डॉ .धवलसिंह मोहीते पाटील यांनी केले आहे.

No comments