akluj । युवासेना अकलूज शहरच्या वतीने मोफत मास्क वाटप
संपूर्ण जगाला कोरनो व्हायरसने हतबल केले असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.या व्हायरस पासून बचाव करण्यासाठी महाराष्ट्राचे कर्तव्य दक्ष मुख्यमंत्री मा.उध्दव ठाकरे साहेब युवासेना प्रमुख मा.आदित्य ठाकरे साहेब महाराष्ट्राची तळमळीने काळजी करताना दिसत आहेत त्यांच्याच मार्गदर्शकत्वाची दखल घेऊन युवासेना अकलूज शहराच्या वतीने मास्कची सुद्धा तेवढीच गरज आहे.हे ओळखुन अकलूज परीसरात दहा रुपयाला मिळणारा मास्क काळया बाजाराने चाळीस ते पन्नास रुपयाला विक्रेते विकताना दिसत आहेत.त्यामुळे हातावरचे पोट असणारे नागरीक पैशा अभावी मास्क घ्यायला टाळाटाळ करत आहेत.तसेच संपुर्ण भारत बंद असताना जनतेसाठी 24 तास काम करणारे पोलिस,वीज कामगार,ST कामगार, सफाई कामगार,भाजी विक्रेते,हमाल वर्ग,रिक्षा चालक, पत्रकार व इतर आरोग्य विभागाशी संबंधित कामगार यांची काळजी घेणं हे आपलं कर्तव्य आहे.हे लक्षात घेऊन युवासेना अकलूज शहराच्या वतीने लोकांना दररोज वॉश करून दररोज वापरता येतील असे कापडी मास्कचे अकलूज शहरात मोफत वाटप करण्यात आले.त्या प्रसंगी युवासेना प्रमुख शेखर(भैय्या)खिलारे,संदीप इंगवले,बिपिन बोरावके,किरण नरळे,लक्ष्मण वाघमारे,उपस्थित होते.कोरनोला घाबरु नका काळजी स्वतःची आणि इतरांची काळजी घ्या.हा संदेश युवासेनेचे अकलूज शहर प्रमुख शेखर खिलारे यांनी दिला आहे.गरज पडल्यास तातडीने युवासेना अकलूज शहर पदाधिकार्यांशी संपर्क करा असे आवाहन त्यांनी केले.
No comments