अवकाळी पावसाने सोलापूर जिल्ह्याला झोडपले

अवकाळी पावसाने सोलापूर जिल्ह्याला चांगलेच झोडपले असून या अवकाळी पावसामुळे द्राक्ष, डाळिंब या फळबागांचे तर गहू, ज्वारी, मका या भुसार पिकांचे चांगलेच नुकसान झाले आहे. 

काल रात्री सोलापूर ,उस्मानाबाद,बीड लातूर,जालना औरंगाबाद या जिल्ह्यात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे ,तसेच आज पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भातील काही जिल्ह्यात जोरदार पाऊस पडेल असा हवामान खात्याने इशारा दिला होता. 
सोलापूर जिल्ह्यातील माढा, करमाळा, सोलापूर, बार्शी सह माळशिरस व सांगोला या भागात हा अवकाळी पाऊस जोरदार वाऱ्यासह कोसळला. नि यामुळे हाता तोंडाला आलेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. 

No comments