इंदोरीकरांच्या अडचणी वाढल्या; अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल होणार?


मुलगा-मुलगी जन्माचा फाॅर्म्युला देऊन ह.भ.प. इंदोरीकर महाराज देशमुख चांगलेच गोत्यात अडकले आहेत. त्यातच त्यांच्या अडचणीत भर पडण्याची शक्यता आहे. कारण इंदोरीकर महाराजांवर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला जावा, अशी मागणी चांभार समाजाकडून करण्यात आली आहे.

इंदोरीकर महाराजांनी आपल्या कीर्तनात चांभार समाजाचा अवमान केल्याची तक्रार वंचित बहुजन आघाडी आणि चर्मकार समाजाने मुंबईतील वर्तक पोलिस ठाण्यात दाखल केली आहे. त्यामुळे इंदोरीकरांचं टेंशन वाढणार आहे.

No comments