विज्ञानाच्या प्रयोगात रमले वेळापूरच्या ग्रीन सिटी चे विद्यार्थी

राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आयोजित केलेल्या विज्ञान प्रदर्शनातील प्रयोगांमध्ये ग्रीनसिटी मधील विद्यार्थी रमून गेले.
श्री संत सावतामाळी शिक्षण प्रसारक मंडळ माळीनगरच्या ग्रीनसिटी इंग्लिश स्कूलमध्ये आर्ट, क्राफ्ट आणि विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. याचे उद्घाटन विद्यार्थी पालक पुष्पा काटे व अश्विनी माने देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले.
प्राचार्य कल्याण मुळे म्हणाले, संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र गिरमे, सदस्या सारंगा गिरमे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. संशोधनातून देश प्रगतीच्या वाटेवर चालणे हे विद्यार्थ्यांच्या कल्पनेतून अधिक सोपं होणार आहे. निरनिराळे शोध संशोधकाकडून लावले जातात. १ ली ते ४ थी च्या विद्यार्थ्यांनी याचाच अभ्यास करून ४५ प्रकल्पांचे सादरीकरण केले. प्रत्येक विद्यार्थ्यामधील संशोधकाला प्रोत्साहन देण्याचे काम या प्रशालेने विज्ञान प्रदर्शनाच्या माध्यमातून केले आहे. आरोग्य, सदृढ आरोग्य संसाधन, व्यवस्थापन आणि अन्न सुरक्षा, कचरा व्यवस्थापन, जलाशयांचे संरक्षण, वाहतूक आणि दळणवळण, डिजीटल आणि तांत्रिक समाधान हे विषय विद्यार्थ्यांना देण्यात आल्याचे मुळे यांनी सांगितले.
हे प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी वर्षा म्हेत्रे, राणी हेगडे, रुपाली चव्हाण, रुपाली नाईकनवरे, प्रियंका पिसे, वृषाली कादबाने, रेश्मा तांबोळी, लक्ष्मी बनसोडे आदींनी परिश्रम घेतले.

No comments