लवंग । फीनिक्स इंग्लिश स्कूल येथिल बाल गोपालांचा रंगोत्सव मोठ्या उत्साहात साजरा
फीनिक्स स्कूल मधील बालकांनी रासायनिक रंगापासून होणारे दुष्परिणाम ऐकून रासायनिक रंगांना राम राम ठोकला आणि नैसर्गिक रंगाची उधळण करून,रंगोत्सव साजरा केला . विदयार्थ्यांना मार्गदर्शन करताना शाळेच्या संचालिका व मुख्यध्यापिक सौ नूरजहाँ शेख म्हणाल्या रंगपंचमी हा सण उन्हाळ्यात येतो पौराणिक काळात बाळ श्री कृष्ण आपल्या बाळ गोपालांसह खेळताना उन्हाची तीव्रता कमी जनवावी म्हणून पिचकारी मध्ये पाणी भरून आपल्या सवनगड्यांसोबत खेळत असत . फुले,भाजी पाला झाडे झुडपे , हळद यांचा वापर करून रंगपंचमीसाठी रंग तयार केले जायचे.त्यामुळे कोणतेही दुष्परिणाम होत नसत हल्ली चे रासायनिक रंग आपल्या शरीरासाठी घातक असतात आशा रंगाचा वापर न करता नैसर्गिक रंगाचा वापर करा.सण आणि उत्सव हे मानवी मनामध्ये नवचैतन्य घेऊन येतात ते साजरे करताना आपण अंधश्रद्धा न बाळगता वैज्ञानिक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेऊन सण साजरे केले पाहिजेत असे सांगितले.सर्व धर्मियांच्या ईद सण, उत्सवाची माहिती देऊन मोठ्या उत्साहाने उत्सव शाळेत साजरे करण्यात येतात त्यामुळे विद्यार्थ्यांना भारतीय संस्कृतीची ओळख आणि राष्ट्रीय एकात्मते ला खत पाणी बालवयातूनच मिळताना दिसत आहे त्यामुळे शाळेचे कौतुक सर्वत्र होत आहे.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेच्या संचालिका व मुख्यध्यापिका नूरजहाँ शेख,सागर कदम,अल्ताफ शेख,सचिन कदम,समाधान जगताप,रेश्मा अंधारे ,समाधान दुरापे ,बालम कोरबू ,आषाद कोरबू यांनी सहकार्य केले.
No comments