अकलूज । अकलूज पोलिसांनी दिली सूचना , गुन्हेगारांची उडाली दैना


अकलूज पोलिस ठाण्याच्या अंतर्गत वाढती गुन्हेगारीचे प्रश्न पाहता खाजगी सावकारी , मुलींची - स्ञियांची छेडछाड,  लहान व्यापाऱ्यांना ञास देणे कोणत्याही कारणास्तव गाव बंद करून नागरिकांना वेठीस धरणे , रहदारीला अडथळा येईल असे रस्त्यावर वाढदिवस साजरे करणे , वाढदिवसाचा केक कापण्याकरिता तलवारीचा अथवा इतर शस्त्राचा वापर करणे , रहदारीचे नियम न पाळता आपली वाहने कोठेही पार्क करून रहदारीचे उल्लंघन करणे असे विविध प्रकारचे कृत्य करून कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या गुन्हेगारांना अकलूज पोलिस ठाण्याच्या वतीने प्रत्येक चौकात मोठे  कट - आऊट्स लावून नागरिकांना आव्हान करण्यात आले आहे की गुंडाकडून सर्व सामान्य नागरिकांना त्रास  होत असेल तर अकलूज पोलिस ठाण्याशी संपर्क साधून सविस्तर तक्रार नोंद करण्याचे आव्हान  करण्यात आले आहे शिवाय गुंडाना व गुन्हेगारांना या कट - आऊट्स च्या माध्यमातून सज्जड दम भरण्यात आला आहे या गुन्हेगारांना वेळीच वरील कृत्याला आवर न घातल्यास त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील असा इशारा ही देण्यात आला आहे त्यामुळे गुन्हेगारांचे धाबे दणाणले असून कितपत गुन्हेगारावर आळा बसेल हा येणारा काळच ठरवेल नागरिकांना सूचना व जाहिर आव्हानाचे कट - आऊट्स प्रत्येक चौकात लावल्याने ते वाचण्यासाठी व माहिती करून घेण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली आहे.
       शिवाय ५ ते ६ वर्षापूर्वी अकलूजमधील अतिक्रमण काढून नागरिकांना दिलासा दिला होता परंतु अकलूजमधील अतिक्रमण वाढले असून त्यामुळे रहदारीस अडथळा निर्माण होत आहे तरी अतिक्रमण करणाऱ्यावर शासन व प्रशासन  कारवाई करणार का ? असे नागरिकांमधून बोलल जात आहे 
           तसेच अकलूज परिसरात वाढत्या खाजगी सावकारीमुळे सर्व सामान्य व गोरगरिब नागरिक त्रस्त झाले आहे खाजगी सावकाराकडून दिलेल्या रक्कमेला शेकडा ४० ते ८० % रक्कम दरमहा वसुल केली जात आहे त्यामुळे गरिबांचे जगणे कठीण झाले आहे या खाजगी सावकारांच्या गुंड प्रवृत्तीमुळे तक्रार न करता सर्व सहन करत आहेत काही नागरिकांनी खाजगी सावकारांच्या त्रासाला कंटाळून गाव - घर सोडून पळून गेले आहेत पोलिसांकडे अलिकडच्या काळात येणाऱ्या अनेक तक्रारी मुळे अकलूज पोलिसांनी सतर्कता दाखवून नागरिकांना दिलासा देण्याचे सूचना केली , गुन्हेगारांना वेळीच आपल्या कृत्याला आवर घालण्याचा इशारा दिला त्यामुळे नागरिकांमधील भितीचे वातावरण दूर झाल्याचे चित्र दिसत आहे.

No comments