वेळापूर । महिला दिनानिमित्त विविध पुरस्काराने केला सन्मान


  वेळापूर नगरीत जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून शिवशक्ती सामाजिक बहुद्देशीय संस्था वेळापूर यांच्यावतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय  कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आला तसेच महिला सक्षमीकरण यावर मार्गदर्शन व महिलांसाठी संगीत खुर्ची स्पर्धा आयोजित करण्यात आले होती. 
      प्रमुख पाहुणे म्हणून वेळापूर गावच्या  सरपंच सौ.विमलताई जानकर,पंचायत समिती सदस्या सौ.रेणुकाताई माने देशमुख, सौ.सुनंदा फुले, सामाजिक कार्यकर्त्या सौ.चंद्रकला भिसे, डॉक्टर सौ.शुभांगी नाईक, ग्रामपंचायत सदस्या सौ.दौलत मुलानी, सौ.कलावती चंदनशिव पाचपुंड मॅडम,रूपाली बाबर मॅडम आदी मान्यवर महिला उपस्थित होत्या.
यावेळी गं.भा.नागरबाई ज्ञानेश्वर काकुळे, सौ.शालन दत्तू मंडले , कु.लक्ष्मी रामचंद्र थोरात, गं.भा. द्रोपदी शांताराम वसेकर, सौ. सविता दादासाहेब ननवरे, सौ.शहानुर गुलाब दरवेशी, सौ.शकुंतला चांगदेव जाधव, सौ.सुनिता तानाजी बावळे, गं.भा.सत्यभामा ज्ञानेश्वर बनसोडे, गं.भा. रुक्मिणी भिमराव चंदनशिव, बानुबी उमर शेख, सौ. हेमलता नंदकुमार माने देशमुख, सौ.सारिका तानाजी वाघे, सौ.आलका गणेश वाघे, कु.गायत्री संतोष बाबर यांना विविध पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सूर्यकांत भिसे यांनी केले तर आभार चैत्राली  माने देशमुख यांनी मानले . 
यावेळी ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग मंडले,संस्थेचे अध्यक्ष संजय मंडले, माजी उपसरपंच शंकर काकुळे, उपाध्यक्ष महेंद्र बाबर,सचिव युवराज मंडले,अतुल जाधव,तानाजी बावळे,भजनदास मगर, संतोष उरणे, पंप्पू लोहार, दादासो दरवेशी,विनायक चंदनशिव, मारुती माने,सोमनाथ भानवसे,विठ्ठल वाघे,आण्णा गुरुजी,अशोक पवार(सर) संभाजी जाधव, सुनील कुमठेकर, गणेश भापकर,गणेश मंडले,नागेश  नाईकनवरे,माजिद मुलाणी,शिवाजी मंडले,गणेश वाघे,मयूर होडगे आदी मान्यवर उपस्थित होते.

No comments