अकलूज । हातभट्टी वाहतूक व विक्री करणारे गजाआड


अकलूज, ता. माळशिरस येथे अवैधरीत्या हातभट्टी दारूची वाहतूक व विक्री करणाऱ्या तिघांना पोलिसांनी गजाआड केले आहे.
येथील कदम हस्पीटलचे पाठीमागे  आझाद चौका जवळ अकलुज येथे आरोपी नामे 1) बाबू राठोड (पुर्ण नाव माहित नाही)रा. मुळेगाव तांडा सोलापूर याचे सांगणेवरुन आरोपी क्र 2) हणमंत वसंत चव्हाण रा.ढोकबाभुळगाव ता. मोहोळ जि. सोलापूर याने त्याचे ताब्यातील बोलेरो जीप नं. एम.एच.45 ए 8547 मध्ये 19200 रुपये किंमतीची आंबट उग्र घाण वासाची हातभटट्री दारु अवैध दारु वाहतुक करुन आरोपी क्र 3 ) सागर बबन सावंत यास देताना मिळून आला व आरोपी क्र 3) सागर बबन सावंत हा अंधाराचा फायदा घेवून पळून गेला आहे. म्हणुन पोना नवनाथ  वामन सोनटक्के यांनी त्यांचे विरूध्द सरकारतर्फे महा. दारुबंदी कायदा कलम 65(र्इ) प्रमाणे पोलिसांत फिर्याद दिली आहे.
महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम,१९४९ चे 65(e) नुसार पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

No comments