'दिशा’ कायद्याचे महिला आमदारांसमोर सादरीकरण
महिला सुरक्षा आणि तत्सम उपाययोजनांसदर्भात विधानभवनात बैठक
महिलांवरील अत्याचारांना पायबंद घालण्यासाठी करण्यात येणाऱ्या कायद्याच्या अनुषंगाने गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या पुढाकारातून विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर आणि उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या उपस्थितीत सर्व महिला आमदारांची बैठक विधानभवनात आयोजित करण्यात आली.
या बैठकीत आंध्र प्रदेशच्या ‘दिशा’ कायद्याविषयक तसेच महिला अत्याचारविषयक इतर कायद्यातील तरतुदींची माहिती देण्यात आली. राज्यात करण्यात येणाऱ्या कायद्याच्या अनुषंगाने महिला आमदारांच्या सूचना जाणून घेतल्या.
No comments