अर्धनारी नटेश्वर महाविद्यालयात महिला दिन उत्साहात साजरा

  शिक्षण प्रसारक मंडळ अकलूज, संचलित अर्धनारी नटेश्वर महाविद्यालय, वेळापूर येथे महिला तक्रार निवारण समिती व सांस्कृतिक विभागाच्या वतीने जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. या प्रसंगी महाविद्यालयातील सर्व महिला शिक्षक व कर्मचा-यांचा सत्कार करण्यात आला. महाविद्यालयातील कांचन बिराजदार, लक्ष्मी भोसले, ज्ञानेश्वरी उपाध्ये या विद्यार्थीनींनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे महाविद्यालयातील ग्रंथपाल सौ. वैशाली मोरे यांनी आपल्या मनोगतात भारतातील कतृत्ववान महिलांचा आढावा घेतला. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. आशा गायकवाड यांनी आजच्या महिलांसमोरील प्रश्न व आव्हाने या विषयी आपली मते मांडली. महाविद्यालयातील गायत्री बाबर या विद्यार्थीनीने "खेलो इंडिया" या स्पर्धेत यश मिळवल्या बद्दल तीचा प्रभारी प्राचार्य दादासाहेब साठे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्वेता भाकरे हिने केले, कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रतीमा कदम  केले तर कार्यक्रमाचे आभार गायत्री काळे हिने मानले.

No comments