युवकांमध्ये प्रचंड संघटन शक्ती : जानकर । युवक पदाधिकाऱ्यांच्या निवडी
युवकांमध्ये प्रचंड संघटन शक्ती असून हेच युवक तळागाळातील जनतेपर्यंत पक्षाचे काम पोहचवतील व वाढवतील असे विचार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उत्तमराव जानकर यांनी व्यक्त केले.
आज वेळापूर, ता. माळशिरस येथील गरुड या निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या युवक आघाडीचे नवे पदाधिकारी निवडण्यात आले यावेळी जानकर बोलत होते.
यावेळी तालुका युवक उपाध्यक्ष पदी प्रताप मगर(निमगाव), अमोल मदने(पिलीव), रमेश ननवरे(लोंढे मोहितेवाडी), साहिल अनपट(शिंदेवाडी), राहुल खटके(जांभुड), ऋषिकेश सावंत(दसुर), महेश थिटे(कारूंडे), दीपक गोरड(गोरडवाडी) कार्याध्यक्ष पदी कविराज जाधव(मळोली), सहसचिव पदी सुनील गोरे(फोंडशीरस), नितीन रुपनवर(फडतरी), सरचिटणीस पदी भुजंगराव शिंगाडे(काळमवाडी), आनंद पवार(अकलूज), अक्षय खंडागळे(दहिगाव), संघटक पदी आनंद पवार(आनंदनगर), दादा मुलाणी(नातेपुते), लहू पाटील(पिलीव), कोषाध्यक्ष पदी आप्पासाहेब मारकड(मारकडवाडी), सहकोषाध्यक्ष पदी प्रज्योत रणवरे, प्रसिद्धी प्रमुख पदी युवराज रणदिवे(फोंडशीरस), सह संघटक पदी समाधान कोळेकर(चाकोरे) आदी निवडी करण्यात आल्या.
यावेळी वसंतराव माने पाटील, जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब धाइंजे, विकास दादा धाइंजे,पंचायत समिती सदस्य अजय सकट, युवक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष बाबासाहेब माने, शंकरराव काळे पाटील, माळशिरस नगर परिषदेचे सदस्य आप्पासाहेब देशमुख,खुडूस ग्रामपंचायत माजी उपसरपंच डॉ. तुकाराम ठवरे पाटील, धानोरे गावचे सरपंच जिवन भैय्या जानकर, अँड. अविनाश काले, पी एस गायकवाड,शामतात्या मदने,महावीर धायगुडे, मधुकर पाटील, रमेश पाटील,सौरभ बागनवर सर, राहुल सावंत, सालार पठाण,व तालुक्यातील शेकडो कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments