पंढरपूर । वाळूमाफियांची दादागिरी, पोलिसांना केली शिवीगाळ व मारहाण, गुन्हा दाखल
वाळूमाफियांनी सध्या सोलापूर जिल्ह्यात चांगलेच थैमान घातले असून पंढरपूर येथे वाळूमाफियांनी पोलिसांना शिवीगाळ करून मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे.
याबाबत पोलीस कॉन्स्टेबल सुर्वे यांनी पोलिसांत फिर्याद दिली असून वाळूमाफियांवर गुन्हे दाखल करणेत आले आहेत.
सुर्वे यांचे फिर्यादीनुसार,
DYSP श्री.ड.सागर कवडे सो। पंढरपुर यांनी मौजे पिराची कुरोली नदी पात्रातुन अवैधरित्या वाळुचे उत्खनन करून ट्रक्टर व टिपर व्दारे चोरून वाळु वाहतुक करीत आहेत अशी माहीती मिळाल्याने त्यांनी तात्काळ फोनव्दारे पोक/2110 शिवशंकर सोमण्णा हुलजंती यांना सांगितले त्यानतंर मी व पोना/2181 विशाल भोसले,पोना/1693 भवर व पोक/2110 हुलजंती असे मिळुन बातमीच्या ठिकाणी गेलो असता मौजे पिराची कुरोली गावाचे नदीपात्राजवळील समाधान ढवळे यांचे घरासमोरून नदीकडे जाणारे रोडने भिमा नदीपात्रात गेलो असता तेथे दोन इसम पांढ-या रंगाचे बुलेटवर बसलेले होते व त्यांचे पलीकडे एक ट्रँक्टर व टिपर थांबला होता त्यावेळी मी त्यांना तुम्ही इथे का थांबला? असे विचारल्यावर तुम्ही कोण विचारणार असे म्हणाल्यावर आम्ही त्यास पोलीस कर्मचारी असे बाबत सांगितले व थांबलेल्या वाहना मध्ये काय आहे हे पाहण्या करीता गेलो असता दोन्ही वाहनामध्ये वाळु भरल्याचे दिसल्याने त्यावेळी मी थांबलेल्या इसमास या गाड्या कोणाच्या आहेत असे विचारल्यावर गाडी माझीच आहे तुम्हाला काय करायचे आहे असे अरेरावीची भाषा वापरल्याने आम्ही तुझे नाव काय असे म्हणाल्यावर त्यांने त्याचे नाव समाधान ढवळे असल्याचे सांगुन तुम्हाला काय करायचे ते करा असे म्हणुन मला व हुलजंती यांना लाथाबुक्या मारून धक्काबुक्की करून पळुन गेला आहे. ती वेळ 20.00 वा चे सुमाराची होती त्यानंतर सदरचा प्रकार बघुन वाहनाजवळ उभे असलेले दोन इसम देखील अंधाराचा फायदा घेवुन पळुन गेले त्यानंतर घडला प्रकार फोनव्दारे पोक/हुलजंती यांना मा. SDPO कवडे सो। यांना कळविला. त्यानंतर अर्धातासानंतर पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाणे कडील पोहेक/404 जाधव व पोना/08 सय्यद हे सदर ठिकाणी आले त्यावेळी आम्ही सदरची वाहने नदीपात्रातुन काढुन रोडवर आणली व तेथे पळुन गेलेल्या इसमाबाबत चौकशी केली असता त्यांची नावे मनोज मंडले ,सोमनाथ कौलगे व आकाश भोसले सर्व रा-पिराचीकुरोली ता-पंढरपूर असे असल्याचे समजले त्यानंतर नदीपात्रात मिळालेली वाहने पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाणे हजर केली आहेत.
त्याचे वर्णन खालीलप्रमाणे
1)5,04,000/- कि.अं.स्वराज कंपनीचा बिगर नंबरचा ट्रँक्टर जुना वापरता त्यामध्ये एक ब्रास वाळु
2)8,12,000/-कि.अं. टाटा कंपनीचा टिपर नं.MH 12 FZ 8704 जुना वापरता त्यामध्ये तीन ब्रास वाळु
3)1,00,000/-कि.अं. राँयल इनफिल्ड बुलेट बिगर नंबरची जुना वापरती
4)500/- कि.अं. जिओ कंपनीचा जुना वापरता मोबाईल
-------------------
14,16,500/- एकुण कि.अं.
येणेप्रमाणे सदर ठिकाणी मी व सोबतचे कर्मचारी वरिष्ठांच्या आदेशान्वये वर नमुद ठिकाणी कारवाईकरिता गेलो असता 1)समाधान ढवळे 2)मनोज मंडले 3)सोमनाथ कौलगे 4)आकाश भोसले सर्व रा-पिराचीकुरोली ता-पंढरपूर यांनी आम्ही आमचे शासकीय काम करीत असताना त्यामध्ये अडथळा करून आम्हाला अरेरावेची,दमदाटीची भाषा वापरून लाथाबुक्या मारून धक्काबुक्की करून पळुन गेला आहे. तसेच भिमानदीचे पात्रातुन अवैधरित्या वाळुचे उत्खनन करून ट्रँक्टर व टिपरव्दारे 4 ब्रास वाळु चोरून घेऊन जात असताना मिऴुन आले आहेत म्हणुन माझी त्याचे विरूध्द भा.द.वि.353,379,323,504,34सह पर्यावरण कायदा. कलम 9 व15प्रमाणे सरकारतर्फे कायदेशीर फिर्याद आहे.
No comments