शिंगणापूर । कोथळे घाटात दरोडा, प्रवाश्यांचे दागिने लुटले
शिखर शिंगणापूर येथील घाटात अज्ञात चोरट्यानी प्रवाश्यांचे गाडीवर दरोडा टाकून प्रवाश्यांच्या गळ्यातील सोन्याचे दाग दागिने लुटून नेल्याचा प्रकार घडला असून याबाबत गाडीचे ड्रायव्हर चैतन्य बडुरे यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे.
चैतन्य सखाराम बडुरे यांचे फिर्यादीनुसार,
आम्ही जेजुरी नीरा फलटण मार्गे शिंगणापुर येथे देवदर्शनाकरीता फलटण ते शिंगणापुर या रोडने निघालो होतो आम्ही कोथळे ते शिंगणापुर या रोडने जात असताना कोथळे गावाचे पुढे घाटात रात्री10/30वा.चे सुमारास आलो असता घाटात आमचे गाडीस तीन मोटार सायकल व त्यावरील सहा इसम आम्हास पास करुन पुढे गेले आमची गाडी घाट चढत होती .त्यावेळी आम्हाला वडाच्या झाडाजवळील वळणावर सदर मोटारसायकली व सहा इसम थांबलेले दिसले ते थांबलेले पाहुन ते आडवण्यासाठी थांबलेले आसावेत असा सशंय आल्याने मी आमची गाडी परत पाठीमागे रोडने वळवत असताना ते सर्वजण आमचे गाडी जवळ आले व माघारी वळुन कुठे चालला आहे . पुढे का आला नाही म्हणुन त्याच्या पैकी एका इसमाने माझे क्रुझर गाडी ची चावी हिसकावुन घेतली व माझे उजवे हातावर काठी मारुन आम्हा सर्वजणाना म्हणाले की तुमच्या जवळ असलेले सर्व पैसे व सोने आम्हाला द्या नाही दिले तर तुम्हाला जीव मारेन असे म्हणुन असे गाडीचे पाठीमागे व साईटच्या काचेवर दगडाने व लाकडी दांडक्याने काच फोडली व माझे खिशातील मोबाईल काढुन घेतला तसेच माझे गाडीतील इतर पुरुष व महीला यांचेकडील रोख रक्कम व दागिने जबरदस्तीने काढुन घेतले व त्याचेकडील मोटार सायकलीवरुन शिंगणापुरच्या दिशेने निघुन गेले आमचेकडील जबरदस्तीने काढुन नेले मालाचे वर्णनखालीलप्रमाणे
1) 500/रु किंमतीचा माझ्याजवऴील सँमसंग कंपनीचा काळ्या रंगाचा त्यात आयडिया कंपनीचे सिमकार्ड त्याचा नं.7775089238 असा असलेले मोबाईल किं.अ.
2) 6000/- रु किंमतीचे गजुबाई त्रिबंक सुर्यवंशी हिचे कडील काळ्या मण्यात ओवलेले दोन ग्रँम सोन्याचे मणि जुने वापरते व 2000/रुपये रोख रक्कम
3) 12000/रु किंमतीचे कोंडाबाई अनिल सावंत हिचेकडीलआर्ध तोळ्याचे काळ्या मण्यात ओवलेले मणिमंगळसुत्र जुने वापरते व 2000/रु रोख रक्कम
4) 6000/रु किंमतीचे धोंडाबाई गोविंद वडजे हिचेकडील काळ्या मण्यात ओवलेले तीन गँमचे मणिमंगळसुत्र जुन वापरते
5) 8000/-रु किंमतीचे भामाबाई भागवत कदम हिचेकडील काळ्या मण्यात ओवलेले तीन ग्रँमचे मणि जुने वापरते व रोख रक्कम 2000/रुपये
6) 14000/-रुपये किंमतीचे सुरेखा दिलीप शिरगिरे हिचेकडील काळ्या मण्यात ओवलेले अर्धा तोळयाचे मणिमंगळ सुत्र व दोन ग्रँम कर्णफुले जुने वापरते
7) 1500/-वनिता मधुकर शिरगिरे हिचेकडील रु रोख रक्कम
8) 23000/-किंमतीचे सुमन ज्ञानदेव सावंत हिचेकडीलकाळ्या मण्यात ओवलेले अर्घा तोळ्याचे मणिमंगळसुत्र व दोन ग्रँमची कर्णफुले जुने वापरते व रोख रक्काम 9000/- रुपये
9) 4600/-रु किंमतीचे मंगल नागनाथ शिरगिरे हिचेकडील काळ्या मण्यात ओवलेले दोन ग्रँमचे मणिमंगळसुत्र जुने वापरते व रोख रक्कम 600/-रु
10) 4000/-रु किंमतीचे काशीबाई शिवाजी वडजे हिचेकडील काळ्या मण्यातील ओवलेले दोन ग्रँमचे मणिमंगळसुत्र जुने वापरते
11) 7500/-रु किंमतीचे रुक्मिणीबाई आबा शिरगिरे हिचेकडील काळ्या मण्यात ओवलेले दिड ग्रँमचे मणिमंगळसुत्र व दोन ग्रँम कर्णफुले जुने वापरते 12) 10000/-रु किंमतीचे संगिता धनाजी सावंत हिचेकडील काळ्या मण्यात ओवलेले पाच ग्रँमचे मणिमंगळसुत्र जुने वापरते
13) 500/-रु किंमतीचा धनाजी मारुती सावंत ह्याजवळील स्पाईस कंपनीचा मोबाईल त्यामध्ये आयडिया कंपनीचे सिमकार्ड त्यांचा नं.9011970730असा असलेला जुना वापरता
14) 8000/-रु किंमतीचे विमल वसंत शिरगिरे काळ्या मण्यात ओवलेले दोन ग्रँमचे मंगळसुत्र व दोन ग्रँमचे कर्णफुले जुने वापरते
--------------
एकुण 105600/- रू किंमतीचे
येणे प्रमाणे वरील वर्णनाचे व किंमतीचे दागिने तीन मोटार सायकलीवरील सहा अनोळखी इसमानी दि.11/03/2020 रात्रौ 10/30वा सुमारास आमचे क्रुझर गाडी नं.एम.एच 13ए.सी 8359ही शिंगणापुर कडे जात असताना कोथळे घाट ता. माळशिरस येथे आडवुन गाडीच्या काचा फोडुन 1000/-रुपयेचे नुकसान करुन माझे उजवे हातावर काठीने मारुन व आमचे गाडीतील महीलांना व पुरुष शिवीगाळी व दमदाटी करुन वरिल वर्णानाचे एकुण 97600/-रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम जबरदस्तीने चोरुन शिंगणापुरच्या दिशेने मोटार सायकलीवरुन निघुन गेले .त्यांचे वर्णन खालील प्रमाणे वय अंदाजे 20 ते 25वर्षे वयोगटातील त्यांची उंची अंदाजे साडे पाच फुट दोन इसमाच्या अंगात जरकिंग ,व इतर इसमाचे अंगात टिशर्ट घातलेले होते म्हणुन माझी सदर इसमाविरुद्ध विरुध्द फिर्याद आहे.
याबाबत अज्ञात चोरट्यांविरुद्ध भारतीय दंड संहिता १८६०
३४१, ३९५, ५०४, ५०६, ४२७ नुसार गुन्हा दाखल करणेत आला आहे.
No comments