खळव्याच्या वाळूमाफियांचे करकंब कनेक्शन उघड । पोलिसांत गुन्हा दाखल
खळवे, ता. माळशिरस येथील वाळूमाफियांचे करकंब कनेक्शन आता उघड झाले असून चोरून वाळू उपसा व वाहतूक करताना या वाळू माफियास पोलिसांनी रंगेहाथ पकडून गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोना विजय गोरवे यांनी पोलिसांत फिर्याद दिली असून त्यांचे फिर्यादीनुसार,
सपोनि पाटील सो यांचे मार्गदर्शंनाखाली मी व पो.ना.518सुळ, असे आम्ही पोलीस ठाणे हदद्दीत अवैदय धंदे रेडकामी खाजगी वाहनाने रवाना झाले असता आम्ही मौजे तरटगाव ता पंढरपुर येथे आलो असता बातमी दारामार्फत बातमी मिळाली की तरटगाव हद्दीतील संपतराव मारुती पाटील यांचे शेती गट नं 56 शेतालगत भिमा नदीचे पात्रातुन एक इसम ट्रँक्टर डंपिंगचे सहाय्याने अवैदयरित्या वाळु उपासा करित आहे अशी माहीती मिळाल्याने आम्ही लागलीच सदर ठिकाणी गेलो असता भिमा नदी पात्रात ट्रँक्टरमध्ये वाळु भरत असताना मिळुन आला ती वेळ 15/00वा ची होती.आम्ही सदर इसमास नाव गाव विचारता त्याने आपले नाव मोहसीन खुदबुद्दीन शेख वय-23वर्षे रा खळवे ता माळशिरस असे असल्याचे सांगितले त्यास वाळु उपसाबाबत परवाना आहे का असे विचारले असता तो उडवा-उडवीची उत्तरे देवु लागला व त्याने ट्रँक्ट्ररचे डंपिंगमध्ये वाळु भरलेली दिसुन आली.
ट्रँक्टर व वाळुचे वर्णन खालील प्रमाणे .
1)2,50,000/- रुपये एक निळे रंगाचा फार्मटँक कंपनिचा ट्रँक्टर आर.टी.ओ नंबर MH 45 F 7991त्यास पाठीमागे लाल रंगाचा डंपींग ट्रेलर त्यामध्ये वाळु असलेला आडजुना वापरता किमंत अंदाजे
2)2000 /- अर्धा ब्रास वाळु किंमत अंदाजे 2,000/-रुपये
असा एकुण 2,52,000/-रुपये मुद्देमाल
मिळुन आल्याने तो सदर गुन्ह्याचे कामी पोना/518सुळ यांनी जप्त करुन ट्रँक्टर चालक नामे मोहसीन खुदबुद्दीन शेख वय-23वर्षे रा. खळवे ता.माळशिरस ताब्यात घेवुन पोलीस ठाणेस घेवुन आलो आहे.
तरी मोहसीन खुदबुद्दीन शेख वय-23वर्षे रा. खळवे ता.माळशिरस यांनी भिमा नदीचे पात्रातुन चोरुन वाळु उपसा करुन एक निळे रंगाचा फार्मटँक कंपनिचा ट्रँक्टर आर.टी.ओ नंबर नसलेला त्यास पाठीमागे लाल रंगाचा डंपींग ट्रेलर त्यामध्ये अंदाजे अर्धा ब्रास वाळु किंमत अंदाजे2,000/-रुपये व ट्रँक्टर, डंपींग ट्रेलर किंमत अंदाजे 2,50,000रुपये असा एकुण 2,52,000/-रुपये चे मुद्देमालासह मिळुन आला आहे म्हणुन माझी त्याचे विरुध्द भा.द.वि.स कलम 379व पर्यावरण संरक्षण कायदा कलम 9व 15 प्रमाणे सरकारतर्फे कायदेशिर फिर्याद आहे.
(संग्रहित छाया)
No comments