प्रधानमंत्री जन आरोग्य योजना । जिल्हाधिकारी शंभरकर यांनी घेतला वेळापूर येथे कामाचा आढावा
वेळापुर येथे गणेश जामदार यांच्या प्रेरणा महा ई सेवा केंद्र येथे पंतप्रधानमंञी जन आरोग्य योजनेचे कामकाज सुरु असतानाच दुपारी २.०० च्या सुमारास सोलापुर जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांनी भेट देऊन योजनेच्या बायोमॅट्रिकद्बवारे होणार्या कामकाजाची पडताळणी केली. वेळापुर नगरीत सोलापुर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर आगमन होताच त्यांचा माळशिरस तालुका वैद्यकियअधिकारी डाॅ. रामचंद्र मोहिते यांनी सत्कार केला.
यावेळी सोलापुर जिल्हाधिकारी यांनी सांगितलेकी माळशिरस तालुक्यासाठी १ लाख २० हजार २१ एवढे लाभार्थी होण्याचे उदिष्ठ आहे, राहिलेल्या कुटुंबांनी त्वरीत सदर सेवा केंद्रात जाऊन आपले गोल्डन कार्ड काढून घ्यावे असे अवाहन करुन यावेळी उपस्थित लाभार्थ्यांना सोलापुर जिल्हाअधिकारी व प्रांतअधिकारी शमा पवार यांच्या हस्ते गोल्डन कार्डचे वाटप करण्यात आले,
यावेळी प्रांतअधिकारी शमा पवार, माळशिरस तहसिलदार अभिजीत पाटील, माळशिरस तालुका वैद्यकिय अधिकारी डाॅ. रामचंद्र मोहिते.निवासी नायब तहसिलदार तुषार देशमुख, डाॅ. बिडीओ स्मिता पाटील, अनिरुध्द पिंपळे, सचिन जामदार, नितीन जामदार, सुनिल पुलीगेट, आशा गट प्रमुख सुरेखा नारनवर व लाभार्थी उपस्थित होते.
No comments