पिलीव । अवैधरीत्या गुटखा विक्रीवर झाली कारवाई, पोलिसांत गुन्हा दाखल
दि. १२/०३/२०२० रोजी अन्न व औषध प्रशासन यांनी पिलीव ता. माळशिरस येथील इरफान रसूल शेख,वय ३२ वर्षे,रा.पिलीव यांचे मेन चौकातील तौहिद पान शॉप व तरकारी कॉर्नर या पेढीची तपासणी केली असता त्यात गोवा,विमल, एस ९९,सुपर जेम व इतर विविध ब्रॅण्डचा गुटख्याचा अंदाजे ९९५०/- किंमतीचा साठा विक्री हेतू साठविल्याचे आढळले तर याबाबत साठा मालकास चौकशी केली असता आपण स्व:त विक्री हेतु चडचण कर्नाटक येथून आणला असल्याचे सांगितले. सदर साठ्यामधून अनौपचारिक अन्न नमुने घेऊन उर्वरित साठा जप्त करण्यात आला व सदर इसमाविरूद्ध माळशिरस पोलिस स्टेशन येथे भादंवि ३२८, १८८,२७२,२७३ व अन्न सुरक्षा व मानके कायद्यांतर्गत कलम ५९ नुसार फिर्याद देण्यात आली आहे. सदर कारवाई सहाय्यक आयुक्त (अन्न) श्री. प्र. मा. राऊत यांचे उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी श्री भारत भोसले यांनी सहकारी अन्न सुरक्षा अधिकारी सर्वश्री. प्रशांत कुचेकर, मंगेश लवटे, उमेश भुसे व योगेश देशमुख यांच्या सहकार्याने पार पाडली.
No comments