सांगोला । सासऱ्यानी व मेव्हण्यांनी दिला जावयाला चोप
आमच्या दारात यायचे नाही म्हणत सासऱ्यानी व मेव्हण्यांनी जावयाला चोप दिल्याची घटना शिवणे, ता. सांगोला येथे घडली असून याबाबत किरणकुमार सदाशिव गळवे यांनी सांगोला पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे.
किरणकुमार सदाशिव गळवे यांचे फिर्यादीनुसार,
माझे सासरे 1) दादा शंकर काळेल रा.गळवेवाडी, वाकी शिवणे, ता.सांगोला याने यांनी मला आमचे दारात यायचे नाही , मुलांना भेटायचे नाही असे म्हणुन त्यांचे हातातील लाकडी काठीने माझे डावे हात, पाठीवर मला मारहाण केली. व मेव्हणा 2) नवनाथ दादा काळेल व मेव्हणा 3)बापु दादा काळेल यांनी मला हाताने लाथाबुकक्याने मारहाण केली. व शिवीगाळी करुन दमदाटी केली आहे.
सांगोला पोलिसांत भारतीय दंड संहिता १८६० चे ३२३, ३२४, ५०४, ५०६, ३४ नुसार सासरे व मेव्हणे यांचेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
No comments